सामाजिक लोकशाही चे जनक...

 

💙💙💙💙डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर💙💙💙
   
लोकशाही जिवंत राहण्यासाठी बाबासाहेबाचे विचार. .....
बाबासाहेब घटना सादर करताना म्हणतात ,"आम्ही भारतीय लोक मिळवलेले स्वातंत्र्य परत गमावणार तर नाही? भारतीयांना काही स्वतःच्याच विश्वासघा ताने व देशद्रोही पणा मुळे स्वातंत्र्य गमवावे लागेलं , या चिंतेने माझे मन ग्रासले आहे . जातीभेद , पंथभेद या जून्या शत्रुमध्ये परस्पर विरोधी नविन पक्षांची भर पडली आहे. आम्हीं आपल्या पक्ष,पंथ, धर्म, भाषांना देशापेक्षा व राष्ट्र हिता पेक्षा अधिक महत्त्व दिले तर आम्ही आपले स्वातंत्र्य गमावून बसू . म्हणून आपण देशरक्षणासाठी शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे". लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी काही पथ्ये कटाक्षाने पाळायची खबरदारी घ्यायला सांगितले . हिंसात्मक आंदोलन व माध्यमांचा  अवलंब केला जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.हिंसात्मक आंदोलने म्हणजे बेबंदशाहीची बाराखडी होय . सनदशीर मार्गांचा च अवलंब करावा . विभुतीपुजा टाळावी . महान व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी . परंतु आपले विचारस्वातंत्र्य गहाण टाकू नये अशी त्यांची स्पष्ट पथ्ये आहे.....

देशात , समाजात , जातिधर्माच्या नावाने विषमता  असू नये . धर्म सहिष्णुता असावी. धर्म द्वेष नसावा. लोकशाहीच्या यशासाठी संवैधानिक नीतिमत्ता व सामाजिक लोकशाही शिवाय स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही . निवडणुकांमध्ये धनसत्ता व बलसत्तेचा गैरवापर व धुड धूस होऊ नये. ' वन मॅन वन व्हॉट' बरोबरच ' वन व्हॉट वन व्हॅल्यू ' ची ही अंमलबजावणी व्हावी , यावर त्यांनी भर दिला......


लेक आवडल्यास शेअर करा ...
जय भीम.......

Comments

Popular posts from this blog

आर्वी ते वर्धमनेरी रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून थांबलेले आहे आणि आता पावसाळा मध्ये हा रस्ता जीव घेणा ठरणार आहे म्हणून भिम टायगर सेना आर्वी व वर्धमनेरी तर्फे आज दिनांक १८/८/२०२० रोजी निवेदन देण्यात आले..